चोराने ९०,००० रुपयांचे “तेल’ नेले!; मोताळ्यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा शहरातील आठवडे बाजारात एम. ए. ट्रेडर्स फोडून चोरट्याने तीन लोखंडी बॅरल ज्यात प्रत्येकी २०० लिटर खाद्य तेल होते. ते लंपास केले आहेत. एकूण ६०० लिटर खाद्य तेल (किंमत ९० हजार रुपये) चोरीस गेल्याची तक्रार दुकानाचे मालक मोहम्मद नाशीर मोहम्मद मन्सूर अबला यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा शहरातील आठवडे बाजारात एम. ए. ट्रेडर्स फोडून चोरट्याने तीन लोखंडी बॅरल ज्यात प्रत्येकी २०० लिटर खाद्य तेल होते. ते लंपास केले आहेत. एकूण ६०० लिटर खाद्य तेल (किंमत ९० हजार रुपये) चोरीस गेल्याची तक्रार दुकानाचे मालक मोहम्‍मद नाशीर मोहम्‍मद मन्‍सूर अबला यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरिक्षक अशोक रोकडे करत आहेत.