त्‍यांचा ‘खेळ’ काही जमलाच नाही…; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरटे आले, शटर तोडण्याचा प्रयत्न केला; पण बराच वेळ होऊनही यश आलं नाही. अखेर दिवस उजाडण्याची वेळ आली आणि मग खाली हात त्यांना परतावं लागलं… पण त्यांचा हा सारा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बुलडाणा शहरातील एडेड हायस्कूल चौकात असणाऱ्या नरसिंहा स्पोर्ट्स दुकानात आज, 27 फेब्रुवारीला …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चोरटे आले, शटर तोडण्याचा प्रयत्‍न केला; पण बराच वेळ होऊनही यश आलं नाही. अखेर दिवस उजाडण्याची वेळ आली आणि मग खाली हात त्‍यांना परतावं लागलं… पण त्‍यांचा हा सारा प्रताप सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बुलडाणा शहरातील एडेड हायस्कूल चौकात असणाऱ्या नरसिंहा स्पोर्ट्स दुकानात आज, 27 फेब्रुवारीला पहाटे ही घटना घडली.


चिखली रोडवर श्रीकृष्ण शेटे यांचे नरसिंहा स्पोर्ट्स साहित्‍याचे दुकान आहे.आज सकाळी ते दुकानाकडे चक्कर मारण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर वाकलेल्या अवस्थेत दिसले. दुकान उघडल्यानतर घडलेला संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालेला दिसला. पहाटे 4:30 वाजता दोन चोरट्यांनी लोखंडी टॉमी घेऊन शटर वाकवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ होऊनही शटर उघडता न आल्याने व दिवस उजाडण्याची वेळ झाल्याने चोरट्यांनी पोबारा केला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी सुद्धा चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याने चोरट्यांची हिंमत वाढल्याचे दिसत आहे.