छत्तीसगडमध्ये केला होता मनिषाचा खून; दोन राज्यांचे पोलीस घेत होते शोध… बुलडाण्याच्या ‘एलसीबी’ने देऊळगावमहीजवळ पकडले!

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः छत्तीसगड राज्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला बुलडाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज, 8 मार्चला देऊळगाव महीजवळील धोत्रा फाटा येथून ताब्यात घेतले. अभिषेककुमार रमेश सिंग (रा. डालतेन गंज, जि. पलामू, राज्य झारखंड) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. छत्तीसगड राज्यातील जसपूर जिल्ह्यातील पथलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मनिषा नामक तरुणीचा खून …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः छत्तीसगड राज्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला बुलडाण्याच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेने आज, 8 मार्चला देऊळगाव महीजवळील धोत्रा फाटा येथून ताब्यात घेतले. अभिषेककुमार रमेश सिंग (रा. डालतेन गंज, जि. पलामू, राज्य झारखंड) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

छत्तीसगड राज्यातील जसपूर जिल्ह्यातील पथलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मनिषा नामक तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात 1 मार्च 2021 रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खून अभिषेककुमारने केल्याचे निष्पन्न झाल्याने छत्तीसगड आणि झारखंड या दोन्ही राज्यांचे पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, काल 7 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला हा आरोपी बुलडाणा जिल्हा परिसरात असल्याचे छत्तीसगड राज्याच्या वरिष्ठ कार्यालयातून कळविण्यात आले होते. त्यावरून स्‍थानिक गुन्‍हे शाखेला यासाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश देत नाकेबंदी करण्याचे आदेश दिले होते. आरोपी देऊळगाव मही परिसरातील धोत्रा नंदई फाट्यावर आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून स्‍थानिक गुन्‍हे शाखेने सापळा रचून शिताफीने अभिषेककुमारला ताब्यात घेतले. त्याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल असलेल्या पथलगाव पोलिसांच्या ताब्यात त्‍याला देण्यात आले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने ‘एलसीबी’चे सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार चतरकर, श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन आहेर, विजय सोनोने,  वैभव मगर, सुभाष वाघमारे, सुधाकर बर्डे यांनी पार पाडली.