छाननी, माघार आटोपले, आता युद्धच! एकेका जागेसाठी 3 उमेदवारांचा संघर्ष

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः छाननी आटोपली. माघारीचे नाट्य संपले. सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकांवर उमेदवार अक्षरशः तुटून पडत राजकीय युद्ध चांगलेच रंगले आहे. साम, दाम, दंड, भेद या तत्त्वांचा सर्रास वापर करून व सर्व निर्देश गुंडाळून आता जिल्ह्यातील पाचेकशे ग्राम पंचायतींमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. नामांकन ते माघारीची अंतिम मुदत …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः छाननी आटोपली. माघारीचे नाट्य संपले. सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकांवर उमेदवार अक्षरशः तुटून पडत राजकीय युद्ध चांगलेच रंगले आहे. साम, दाम, दंड, भेद या तत्त्वांचा सर्रास वापर करून व सर्व निर्देश गुंडाळून आता जिल्ह्यातील पाचेकशे ग्राम पंचायतींमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. नामांकन ते माघारीची अंतिम मुदत म्हणजे 4 जानेवारीपर्यंत होती. उमेदवार, आजी माजी आणि भावी सरपंच, पडद्यामागचे सूत्रधार, गाव पुढारी अन् हजारो कार्यकर्त्यांनी साहेब लोकांचं ऐकलं, शांती ठेवली, संयम बाळगला. मात्र निवडणूक चिन्ह हाती आल्यावर हे सर्व जण थेट निवडणुकीच्या रणांगणात येऊन एकमेकांसमोर उभे ठाकले. आता प्रचाराचे रथ, लढण्याचे विविध फंडे, राजकारण अन् समाजकारणाची आयुधे, पैशाचा अन् लालपिवळ्या पाण्याचा महापूर, चुरस, टोकाचे राजकारण, काहीही अन् कसेही करून विजय मिळविण्याची आसुरी जिद्द असे सर्वच काही पहावयास मिळत आहे. सोशल मीडियावरून होणार्‍या हायटेक प्रचाराने याला चार चाँद लावलेत! निवडणूक प्रचार संपल्यावर मग कत्तल की रातमध्ये तर विचारण्याची सोय नसणार..! दृष्टिक्षेपात रणसंग्राम एकूण ग्रामपंचायती 527, प्रभाग 1771, जागा 4805, प्राप्त अर्ज 13608, छानणीत बाद 228, बिनविरोध 894, आता रिंगणात 10144, जागा 3884