जंगलाला आग, बॅटरी चोरी… वनविभागाचे दोन कर्मचारी निलंबित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनिल मोरे आणि कैलास सलामे अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गेल्या महिन्यातही वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. बुलडाणा मुख्य उपवन संरक्षक अक्षय गजभिये यांनी निलंबनाचे आदेश काढले. वनविभागाच्या वरवंड बीटमध्ये आग लागून 12 हेक्टर वनक्षेत्र जळाले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनिल मोरे आणि कैलास सलामे अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गेल्या महिन्यातही वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. बुलडाणा मुख्य उपवन संरक्षक अक्षय गजभिये यांनी निलंबनाचे आदेश काढले.

वनविभागाच्या वरवंड बीटमध्ये आग लागून 12 हेक्टर वनक्षेत्र जळाले होते. त्यामुळे कर्त्याव्यात कसूर केल्याचा ठपका वनरक्षक अनिल मोरे यांच्यावर ठेवण्यात आला व त्यांचे निलंबन करण्यात आले. तसेच जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात कुवरदेव बिटचे वनरक्षक कैलास सलामे यांच्यावर गोमाल गावातील एका आदिवासी घरातून बॅटरी चोरल्याचा आरोप होता. तशी तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्‍यामुळे कैलास सलामे यांनाही निलंबित करण्यात आले आहे.