जनता कर्फ्यूमध्ये उद्या फक्त ऑटोरिक्षांना परवानगी! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मुभा!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः हेडिंग वाचून कुणीही प्रामुख्याने शेकडो ऑटो चालकांची ,’ काय येड्यात काढता राव, आमाले येडा समजता की तुम्ही लय शाने’? असा सवाल करतील, वरकरणी त्यांची प्रतिक्रिया रास्त वाटत असली तरी हे हेडिंग सत्य आहे. फक्त ही मुभा केवळ बुलडाणा शहरात आणि सकाळी 9 ते दुपारी 2 या मर्यादित वेळेसाठी राहणार आहे. जनता कर्फ्यूमध्ये ऑटोला …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः हेडिंग वाचून कुणीही प्रामुख्याने शेकडो ऑटो चालकांची ,’ काय येड्यात काढता राव, आमाले  येडा समजता की तुम्ही लय शाने’? असा सवाल करतील, वरकरणी त्यांची प्रतिक्रिया रास्त वाटत असली तरी हे हेडिंग सत्य आहे. फक्त ही मुभा केवळ बुलडाणा शहरात आणि सकाळी 9 ते दुपारी 2 या मर्यादित वेळेसाठी राहणार आहे.

जनता कर्फ्यूमध्ये ऑटोला मुभा या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मानवीय भूमिकेची पार्श्वभूमी आहे. त्यांनी जारी केलेल्या कर्फ्यूच्या  आदेशात पूर्व घोषित परीक्षा वेळेवरच होतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. आता सार्वजनिक आरोग्य सेवा अंतर्गत गट कच्या जागांसाठी उद्या रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान लेखी परीक्षा पार पडणार आहेत. बुलडाणा शहरातील 9 केंद्रांवरून ही परीक्षा पार पडणार आहे. तसेच 28 तारखेलाच बुलडाणामधील जिजामाता महाविद्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान  राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून  ऑटोरिक्षा धारकांना मुभा देण्यात आली आहे. यामुळे रविवारी सकाळी 9 ते 2 दरम्यान कडकडीत संचारबंदीमध्ये शहरातील रस्त्यांवर ऑटो धावताना दिसणार आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांसह आयोजक’ जिंजर’ला देखील मुभा, पोलीस बंदोबस्तही राहणार
उद्या 28 तारखेला होणाऱ्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या लेखी परीक्षेसाठी जिंजर वेब प्रायव्हेंट कंपनी व आरोग्य कर्मचाऱ्यांना शहरात संचाराची मुभा देण्यात आली आहे. तसेच 9 परीक्षा केंद्रांना पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश डीएसपी ना देण्यात आले आहेत. गट क अंतर्गतच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी 28 ला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजे दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, बुलडाणा शहरातील शारदा ज्ञानपीठ, लिंगाडे पोलिटेकनिक, शाहू अभियांत्रिकी, केंब्रिज स्कुल, शिवाजी हायस्कुल, प्रबोधन स्कूल, लद्धड अभियांत्रिकी, आयुर्वेद कॉलेज, शिवसाई कॉलेज या 9 केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जिंजर कंपनी आयोजन करीत आहे. त्यामुळे कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व सार्वजनिक आरोग्य सेवेचे अधिकारी, कर्मचारी यांना शहरात संचाराची (प्रवासाची ) मुभा देण्याची विनंती जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याला परवानगी देण्यात आली आहे.