जनुन्‍यात उत्तररात्री रंगला जुगाराचा डाव!; पोलिसांनी अचानक छापा मारून १९ जणांना पकडले!!, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उत्तररात्री रंगलेल्या जुगार अड्ड्यावर खामगावच्या शिवाजीनगर पोलिसांनी जनुना (ता. खामगाव) येथे काल, २ सप्टेंबरला साडेअकराच्या सुमारास छापा मारला. तब्बल १९ जणांना या ठिकाणी ताब्यात घेतले असून, एक जण फरारी होण्यात यशस्वी झाला. त्यांच्याकडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ५ मोटारसायकली, २४ …
 
जनुन्‍यात उत्तररात्री रंगला जुगाराचा डाव!; पोलिसांनी अचानक छापा मारून १९ जणांना पकडले!!, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उत्तररात्री रंगलेल्या जुगार अड्ड्यावर खामगावच्‍या शिवाजीनगर पोलिसांनी जनुना (ता. खामगाव) येथे काल, २ सप्‍टेंबरला साडेअकराच्‍या सुमारास छापा मारला. तब्‍बल १९ जणांना या ठिकाणी ताब्‍यात घेतले असून, एक जण फरारी होण्यात यशस्वी झाला. त्‍यांच्‍याकडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ५ मोटारसायकली, २४ हजार रुपये रोख व ११ मोबाइल फोनचा समावेश आहे.

सनी ठोंबरे हा फरारी असून, ताब्‍यात घेतलेल्यांत शाहरुख खान बाबा खान (२९, रा. बर्डे प्लॉट खामगाव), गोपाल प्रकाश सोनी (२५, रा. रेखा प्लॉट खामगाव), लालू गजानन यादव (३०, रा. सतीफैल, खामगाव), अरविंद समाधान म्हसनकार (३२, एमआयडीसी काटानगर खामगाव), नदीम खान मसूद खान (३२, सजनपुरी खामगाव), मेहबूब खान दिलदार खान (३९ रा. बर्डे प्लॉट खामगाव), सय्यद नसीम सय्यद सैदू (४०, रा. बर्डे प्लॉट खामगाव), वसिम अहेमद शेख रब्बानी (३०, रा. सतीफैल खामगाव ), मनोज घनश्याम सोनी (३०, रा. सतीफैल खामगाव), इलियास खान सरफराज खान (४३, रा. जुना फैल खामगाव), शेख इमरान शेख बुढण (३२ रा. नगरपालिकेसमोर चिखली), किसन रामा भगतपुरे (४२, रा. सजनपुरी खामगाव), सूरज लक्ष्मण गुरव (३२, रा. शिवाजी फैल खामगाव), रामदास महादेव सेनान्‍से (३४, वर्षे रा. जनुना ता. खामगाव), अजय राजेंद्रसिंह ठाकूर (४२ , रा. सतीफैल, खामगाव), अरविंद लक्ष्मण बोडके (४५, रा. चांदमारी, खामगाव), सोहेल खान सैफ अली खान (२४, रा. फाटकपुरा खामगाव),गजानन मदन बदर (२२, रा. मीरानगर जनुना खामगाव), वसीम खान मसूद खान (३९, रा. सजनपुरी खामगाव) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अरुण परदेशी यांच्यासह सहायक पोलीस निरिक्षक श्री. जगदाळे, पोलीस उपनिरिक्षक श्री. चव्हाण, डीबी पथकाचे नापोकाँ संदीप टाकसाळ, नापोकाँ देवेंद्र शेळके, पोकाँ रवींद्र कन्‍नर, राम धमोळे, बंटी बडगे, नीलसिंग चव्हाण यांनी केली.