जन्मोत्सव दोन दिवसांवर येऊनही जिजाऊंच्या जन्मस्थळाला अजूनही कुलूप पुरातत्व विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन दिवसांवर राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव आला आहे. प्रशासकीय तयारी आणि राजकीय, सामाजिक पक्ष-संघटनांनीही जोरदार तयारी केली आहे. अशात मात्र सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेला राजवाडा अजूनही कुलूप बंदच आहे. सरकारने मंदिरे, आध्यात्मिक स्थळे, पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी उघडली आहेत. मात्र, कोरोनाच्या नावाने बंद केलेली ऐतिहासिक स्थळे …
 

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन दिवसांवर राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव आला आहे. प्रशासकीय तयारी आणि राजकीय, सामाजिक पक्ष-संघटनांनीही जोरदार तयारी केली आहे. अशात मात्र सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेला राजवाडा अजूनही कुलूप बंदच आहे.

सरकारने मंदिरे, आध्यात्मिक स्थळे, पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी उघडली आहेत. मात्र, कोरोनाच्या नावाने बंद केलेली ऐतिहासिक स्थळे अजूनही बंदच असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्व विभागाच्या देखरेखीत आहे. पण जिजाऊंच्या जन्म सोहळ्यासाठी या परिसराची साधी साफसफाई किंवा एखादा दिवा सुद्धा लावण्याचे काम पुरातत्व विभागाने केलेले नाही. मूळ जन्मस्थळ अंधारात अशी काहीशी स्थिती रात्री बघावयास मिळाली आहे. याबाबतीत पुरातत्व उपसंचालक नागपूर कार्यालयात चौकशी केली असता उपसंचालक सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. या भागाचा पदभार नाशिक पुरातत्व विभागाचे उपसंचालक यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली आहे. जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये 12 जानेवारी 1598 साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागूनच आहे. याच वास्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे.