जय श्रीराम…मेहकरमध्ये पहिल्याच दिवशी अयोद्ध्येतील मंदिरासाठी दीड लाख जमा!

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येत उभारल्या जाणार्या श्रीराम मंदिरासाठी मेहकर तालुक्यात निधी संकलनास सुरुवात झाली आहे. निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन 12 जानेवारी प. पू. श्री 1008 महंत स्वामी अखंड चैतन्यपुरी महाराज (श्री क्षेत्र नीलकंठेश्वर संस्थान मंठा), जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, जिल्हा संयोजक अॅड. गजानन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अयोध्या …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोद्ध्येत उभारल्या जाणार्‍या श्रीराम मंदिरासाठी मेहकर तालुक्यात निधी संकलनास सुरुवात झाली आहे. निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन 12 जानेवारी प. पू. श्री 1008 महंत स्वामी अखंड चैतन्यपुरी महाराज (श्री क्षेत्र नीलकंठेश्‍वर संस्थान मंठा), जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, जिल्हा संयोजक अ‍ॅड. गजानन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अयोध्या येथील भव्य मंदिर निर्माण कार्यात सर्व स्तरातून निधी संकलनसाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन चैतन्यपुरी महाराज यांनी केले. यावेळी डोणगाव येथील श्रीराम भक्त रमेश माधव सावजी यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नी श्रीमती रूपा रमेश सावजी यांनी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश व सौ. वेदा विनय सावजी यांनी 21 हजार रुपयांचा धनादेश दिला. कारसेवक स्व. लक्ष्मीकांत मोहरील यांच्या परिवाराने 21 हजार रुपये धनराशी सुपूर्द केली. सूत्रसंचालन प्रा. सुधीर मुळे यांनी केले. आभार अभियान तालुका प्रमुख नीलेश नाहटा यांनी केले.