जय श्रीराम… २.५ हजार कोटींचा निधी जमा…देणगी गोळा करणे बंद; आता फक्‍त ऑनलाइन देणगी स्‍वीकारणार

अयोध्या (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असून, भारतभरातून यासाठी जनतेकडून देणगी देखील स्वीकारली गेली. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळाल्याने देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा …
 

अयोध्या (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असून, भारतभरातून यासाठी जनतेकडून देणगी देखील स्वीकारली गेली. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळाल्‍याने देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, की घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद केले असून, लोकांना देणगी द्यायची असेल तर त्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल, असे ते म्‍हणाले. देणगीची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे.