जलंबमध्ये बंटी-बबलीचा कारनामा… पोलिसांनी अवघ्या 4 तासांत केले आरोपीला जेरबंद!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात जवळपास 50 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारास जलंब पोलिसांनी अवघ्या 4 तासांत अटक केली. बंटी-बबलीची ही जोडी आपल्या मुलाचा मंदिरावर वाढदिवस असल्याचे सांगून जलंबच्या एका व्यक्तीकडून गॅस सिलिंडर व मोबाइल घेऊन गेले होते.सूत्रांच्या माहितीनुसार, शंकर काशिराम सावळे (66. रा. जलंब) यांच्याकडे काल, 6 फेब्रुवारीला …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात जवळपास 50 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारास जलंब पोलिसांनी अवघ्या 4 तासांत अटक केली. बंटी-बबलीची ही जोडी आपल्या मुलाचा मंदिरावर वाढदिवस असल्याचे सांगून जलंबच्या एका व्यक्तीकडून गॅस सिलिंडर व मोबाइल घेऊन गेले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, शंकर काशिराम सावळे (66. रा. जलंब) यांच्याकडे काल, 6 फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास अनोळखी पुरुष व महिला आली. त्यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस जलंबपासून दोन कि.मी.अंतरावरील पाई मंदिरावर असल्याचे खोटे सांगून त्यांच्या घरून एक एचपी कंपनीचा गॅस सिलिंडर व रेडमी कंपनीचा मोबाइल असा एकूण किंमत साडेसात हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले. थोड्या वेळाने शंकर सावळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातडीने घटनेची माहिती जलंब पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत लगेच तपासाला सुरुवात केली. ठाणेदार धीरज बांडे हे सहायक फौजदार श्री. बोरसे, पोकाँ. विनोद राठोड यांच्यासह या बंटी-बबलीच्या शोधार्थ रवाना झाले. त्यांनी सायबर सेलची मदत घेत बंटीला ताब्यात घेतले. राजू दीपा कोळी (43, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गॅस सिलिंडर व मोबाइल जप्त केला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही (किंमत अंदाजे 40 हजार रुपये) ताब्यात घेतली. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धीरज बांडे, सहायक फौजदार श्री. बोरसे, पोहेकाँ श्री. इंगळे, पोकाँ विनोद इंगळे यांनी केली. तपास सहायक फौजदार दीनकर तिडके करत आहेत.