जलंब परिसरातील शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलंब परिसरात जुलै, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यात उडीद, मूग, सोयाबीन व मध्यंतरी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुभार्व झाल्यामुळे कापसाच्या उत्पन्नात घट झाली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शासनाने गेल्या महिन्यात पुरात शेती वाहून गेलेल्या शेतकर्यांना मदत दिली. मात्र शासनाने जाहीर …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलंब परिसरात जुलै, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले होते. यात उडीद, मूग, सोयाबीन व मध्यंतरी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुभार्व झाल्यामुळे कापसाच्या उत्पन्नात घट झाली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शासनाने गेल्या महिन्यात पुरात शेती वाहून गेलेल्या शेतकर्‍यांना मदत दिली. मात्र शासनाने जाहीर केलेल्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. पिकाची आणेवारी पन्नास पैशाच्या आत आल्यामुळे शेतकरी पिक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल, कृषी विभागाने लक्ष देऊन शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जलंब परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.