जलजीवन मिशनच्‍या प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी ः जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची सूचना; जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी बऱ्याच योजना जुन्या असून त्यांना दुरुस्त करण्याची गरज आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती …
 
जलजीवन मिशनच्‍या प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी ः जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची सूचना; जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी बऱ्याच योजना जुन्या असून त्यांना दुरुस्त करण्याची गरज आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, ७ सप्‍टेंबरला केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत कामे प्रस्तावित करताना लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचना करत जिल्हाधिकारी म्हणाले, की त्यांना विश्वासात घेऊन कामे घ्यावी. तसेच जुन्या योजनांची रेट्रोफिटींगची कामे करावी. जिल्हा स्तरावरील योजनांची कामे पूर्ण करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात याव्यात. या मिशन अंतर्गत दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावयाचा आहे. त्यादृष्टीने योजनांचा आराखडा तयार करावा. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस‍ अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.