जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने तुम्हाला फसवलेय?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा. लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणुकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद १६ जुलै २०१५ रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्यारेलाल जयस्वाल, विष्णूवाडी, बुलडाणा यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी राज गणपत गायकवाड व इतर १० …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा. लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणुकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद १६ जुलै २०१५ रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्यारेलाल जयस्वाल, विष्णूवाडी, बुलडाणा यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी राज गणपत गायकवाड व इतर १० आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज गणपत गायकवाड व इतर १० आरोपींनी अन्य जनतेची देखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशाप्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.