जागेच्या वादातून दोन गटांत राडा; ७ जण जखमी, २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जागेच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना काल १०, सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रुईखेड मायंबा (ता. बुलडाणा) येथे घडली. दोन्हींकडील ७ जण यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडील परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्हीकडील २४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. …
 
जागेच्या वादातून दोन गटांत राडा; ७ जण जखमी, २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जागेच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना काल १०, सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रुईखेड मायंबा (ता. बुलडाणा) येथे घडली. दोन्हींकडील ७ जण यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडील परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्हीकडील २४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विलास जाधव व मंगेश हिवाळे कुटुंबियांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जागेचा वाद सुरू आहे. ९ सप्टेंबर दोन्ही परिवारांमध्ये वाद झाला. मात्र सरपंच व ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत लाठी काठी, चाकू व कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात आला. यात दोन्हीकडील ७ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी धाड आणि त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रारी करण्यात आल्या असून, दोन्हींकडील २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.