जाधव- पिवतकर कुटुंबियांत धुमश्चक्री; लाठ्याकाठ्यांनी दे दना दन…! २८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेरणीच्या दिवसांत शेतीच्या प्रकरणावरून वाद-भांडणे वाढली आहेत. श्रीकृष्णनगर (ता. चिखली) येथील पिवतकर आणि जाधव कुटुंबियांत आज, २२ जूनला सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील मंडळी लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर भिडली. दोन्ही गटांनी अमडापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी केल्या असून, या तक्रारींवरून पोलिसांनी तब्बल २८ जणांविरुद्ध …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेरणीच्या दिवसांत शेतीच्या प्रकरणावरून वाद-भांडणे वाढली आहेत. श्रीकृष्णनगर (ता. चिखली) येथील पिवतकर आणि जाधव कुटुंबियांत आज, २२ जूनला सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील मंडळी लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर भिडली. दोन्ही गटांनी अमडापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी केल्या असून, या तक्रारींवरून पोलिसांनी तब्‍बल २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात पिवतकर गटातील १० व जाधव गटातील १८ जणांचा समावेश आहे.

जाधव गटातील सौ. कलाबाई भगवान जाधव (५५, रा. श्रीकृष्णनगर ता. चिखली) यांनी तक्रार दिली की त्या कुटुंबातील सदस्यांसह आज सकाळी 8 वाजता पेरणीसाठी शेतात गेल्या होत्या. तिथे पिवतकर कुटुंबातील पंडित पिवतकर, अनिल पिवतकर,भागवत पिवतकर, विश्वंबर पिवतकर, सचिन पिवतकर, पमसा पिवतकर, इंदूबाई पिवतकर, लताबाई सोनुने, शिरामन सोनुने, हनुमान दुतोंडे हे जमले. अनिल पिवतकर याने ही शेती आमची आहे. तुम्ही पेरली तर एकेकाला जिवाने मारून टाकतो, असे म्हणत कमलाबाईंच्या सून मीरा रमेश जाधव हिच्या हातावर कुऱ्हाड मारली. पंडित पिवतकर याने कमलाबाईला काठीने मारले. यावेळी भांडण सोडवायला गेलेल्या रमेश जाधव व भगवान जाधव यांना विश्वंबर पिवतकर, भागवत पिवतकर, सचिन पिवतकर, शिरामन सोनुने यांनी लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. हनुमान दुतोंडे ,लताबाई सोनुने, पमसा पिवतकार, इंदूबाई पिवतकार यांनी शिवीगाळ केली. परत शेतात आले तर पाय तोडून टाकतो अशी धमकी दिली. या तक्रारीवरून पंडित पिवतकर, अनिल पिवतकर, भागवत पिवतकर, विश्वंबर पिवतकर, सचिन पिवतकर, पमसा पिवतकर, इंदूबाई पिवतकर, लताबाई शिरामन सोनुने, शिरामन सोनुने, हनुमान दुतोंडे (सर्व रा. श्रीकृष्णनगर, ता. चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटातील अनिल प्रकाश पिवतकर (३६, रा. श्रीकृष्णनगर, ता. चिखली) यांनी तक्रार दिली की त्यांचे रामधन सुपडा पिवतकर यांच्‍यासोबत शेतीवरून वाद सुरू आहे व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आज सकाळी 8 वाजता ते शेतात गेले असता त्यांना तिथे दादाराव बाजीराव जाधव पेरणीसाठी आलेले दिसले. त्यांच्‍यासोबत अन्य १६ ते १७ जण होते. त्यावेळी अनिल पिवतकर यांनी या जमिनीचा सातबारा माझ्याजवळ आहे. आपली कोर्टात केस सुरू आहे. तुम्ही पेरू नका, असे म्हटले असता अनिल पिवतकर यांचा भाऊ भागवत पिवतकर याला दादाराव जाधव याने कुऱ्हाड मारून जखमी केले. इंदूबाई पिवतकर या मध्ये आल्या असता भगवान जाधव याने डोक्यात काठी मारली. त्यावेळी अनिल आवराआवर करायला गेला असता नामदेव जाधव, बाबुराव जाधव, विष्णू जाधव यांनी लोटपोट करून काठ्यांनी मारहाण केली. यावेळी जाधव परिवारातील अन्य सदस्यांनीही मारहाण करायला हातभार लावला. या तक्रारीवरून दादाराव बाजीराव जाधव, भगवान बाजीराव जाधव, उत्तम बाजीराव जाधव, बाबुराव दादाराव जाधव, नामदेव भगवान जाधव, विष्णू दादाराव जाधव, गोपाल भगवान जाधव, गजानन भगवान जाधव, उमेश श्यामराव जाधव, गणेश भुजंगराव जाधव, रमेश उत्तम जाधव, लक्ष्मी दादाराव जाधव, कमलाबाई भगवान जाधव, अजिताबाई नामदेव जाधव, सोनाली प्रमोद गवळी, मीरा रमेश जाधव, सुनिता श्याम जाधव, मनकर्नाबाई भुजंगराव जाधव (सर्व रा. श्रीकृष्णनगर, ता. चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.