जानेफळच्‍या महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू, नव्या ७ बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 19 जुलैला कोरोनाचे केवळ 7 नवे बाधित समोर आले असून, 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात 19 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान जानेफळ (ता. मेहकर) येथील 43 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी …
 
जानेफळच्‍या महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू, नव्या ७ बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 19 जुलैला कोरोनाचे केवळ 7 नवे बाधित समोर आले असून, 3 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्‍णालयात 19 रुग्‍ण उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान जानेफळ (ता. मेहकर) येथील 43 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1232 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1225 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 2 व रॅपिड अँटिजेन तपासणीतील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 727 तर रॅपिड टेस्टमधील 498 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
खामगाव शहर :1, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, चिखली तालुका : सावरखेड 1, नायगाव 1, शिंदी हराळी 1, चिखली शहर : 1, मेहकर तालुका : जानेफळ 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रुग्ण आढळले आहे.

एकूण बाधितांचा आकडा 87209 वर
आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 619066 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86523 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1329 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87209 कोरोनाबाधित रुग्ण असून,सद्यःस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 667 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.