जालना -खामगाव रेल्वेमार्गासाठी केंद्रीय राज्‍यमंत्र्यांना साकडे; डॉ. कायंदे यांनी दिले निवेदन

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ब्रिटिश सरकारच्या काळात मंजूर झालेला आणि मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जालना -खामगाव रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनिल कायंदे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून केली. मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा १५५ किलोमीटर लांबीचा जालना- खामगाव …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ब्रिटिश सरकारच्या काळात मंजूर झालेला आणि मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जालना -खामगाव रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनिल कायंदे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून केली.

मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा १५५ किलोमीटर लांबीचा जालना- खामगाव रेल्वेमार्ग आहेत. शासन व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा रेल्वे मार्ग प्रलंबित आहे. तो ब्रिटिश शासनाच्या काळात १९१२ मध्ये मंजूर झाला होता. या रेल्वेमार्गाचे सर्वेचे काम १९३० पर्यंत पूर्णही झाले होते. त्या अनुषंगाने एका कंपनीला या रेल्वे मार्गाचे काम सुध्दा मिळाले होते. काही प्रमाणात या रेल्वेमार्गाचे काम सुध्दा सुरू झाले होते. अचानक काम बंद पडले.

या बाबत चिखली तालुक्यातील उंद्री येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील यांनी या रेल्वेमार्गाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना करून रेल्वेमार्गासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरवठा सुरू आहे. ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री असताना केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित राहिले. त्यामुळे मराठावाडा व विदर्भाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी डाॅ. कायंदे यांनी केली आहे.