जिगावच्‍या नवीन गावठाणात चोरट्यांचा हैदोस, सव्वा चार लाख रुपयांची चोरी, नुकसान; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील जिगावचे पुनर्वसन पर्यायी नवीन गावठाणात केले असून, या ठिकाणी नागरी सुविधांची कामे व बांधकामे ठेकेदाराकडून दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणच्या सरकारी इमारतींची तोडफोड करण्याचे प्रकार वाढले असून, तसेच चोऱ्याही वाढल्या आहेत. नुकत्याच केलेल्या पाहणीत तब्बल 4 लाख 32 हजार रुपयांचे नुकसान …
 
जिगावच्‍या नवीन गावठाणात चोरट्यांचा हैदोस, सव्वा चार लाख रुपयांची चोरी, नुकसान; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्‍यातील जिगावचे पुनर्वसन पर्यायी नवीन गावठाणात केले असून, या ठिकाणी नागरी सुविधांची कामे व बांधकामे ठेकेदाराकडून दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणच्‍या सरकारी इमारतींची तोडफोड करण्याचे प्रकार वाढले असून, तसेच चोऱ्याही वाढल्या आहेत. नुकत्‍याच केलेल्या पाहणीत तब्‍बल 4 लाख 32 हजार रुपयांचे नुकसान चोरांनी केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक श्री. दौंड आता या चोरांचा शोध प्राधान्याने घेणार आहेत.

कलनी जिगाव प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता रवींद्र दिगंबर कवर (57) यांनी या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सूर्या हॉटेलसमोर जिगाव पुनर्वसन नविन गावठाण आहे. 29 मे रोजी सकाळी रवींद्र कवर यांनी पाहणी केली असता त्‍यांना बऱ्याच ठिकाणी इमारतीत तोडफोड व चोरीचे प्रकार वाढल्‍याचे दिसून आले. यात जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, समाज मंदिर, पांदण रस्त्यावरील झाडे, स्मशानभूमी या ठिकाणी चोरट्यांनी नुकसान करून साहित्‍याची चोरी केली. चोरी व नुकसानीचा सविस्तर अहवालच कवर यांनी पोलिसांना दिला आहे.

कोरोना लसीकरण केंद्रावरील पाण्याची टाकीच नेली चोरून
नांदुरा शहरातील नांदुरा- खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील जलतरण तलाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्रावरील पाण्याची 750 लिटरची टाकीच (किंमत 3000 रुपये) 31 मेच्या रात्री चोरट्यांनी चोरून नेली. नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन बेंडे यांनी काल, 2 जून रोजी या चोरीची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात केली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पो. काँ. अमर कस्तुरे करीत आहेत.