जिजामाता साखर कारखाना पुढच्या वर्षी सुरू करणार ः पालकमंत्री डॉ. शिंगणे

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना ही एक कामधेनू असून हा कारखाना सुरू करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो. आता कामगारांची देणी पुढील काही दिवसांत अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिजामाता कारखाना पुढील वर्षी मी चालू करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी 23 जानेवारी …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना ही एक कामधेनू असून हा कारखाना सुरू करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो. आता कामगारांची देणी पुढील काही दिवसांत अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिजामाता कारखाना पुढील वर्षी मी चालू करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी 23 जानेवारी रोजी हिवरा फाटा पिंपळगाव कुडा येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.
यावेळी माजी खासदार सुखदेव काळे, शिकवेल बायोटेकचे संजय वायाळ, अर्चना गजानन झोरे, दमयंती शेवाळे, जि. प. सदस्य पंडितराव खंदारे, माजी उपसभापती इरफान अली अशोकराव जाधव, जगनराव ठाकरे, प्राचार्य विजय नागरे, सरपंच वैजीनाथ कुडे, खुशालराव जाधव हजर होते. जिजामाता कारखाना सुरू करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. कारखाना आहे त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी मंत्रालयात 28 किंवा 29 जानेवारीला महत्त्वाची बैठक होणार आहे. खडकपूर्णा प्रकल्पामुळे भरपूर पाणी आहे. तसेच पूर्णा नदीवरील केटिवेअरचे लवकरच नूतनीकरण करणार आहे. याबाबत सुद्धा लवकरच मंत्रालयात बैठक होणार आहे, असेही डॉ. शिंगणे यांनी यावेळी सांगितले.