जिजामाता साखर कारखाना सुरू करण्याच्‍या हालचाली; “समर्थ’च्‍या टोपेंना घेऊन पालकमंत्री “ॲक्‍शन’ मोडमध्ये!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तांत्रिक अडचणींमुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेला सिंदखेड राजा येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतला अाहे. यादृष्टीने त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यासह नुकतीच कारखान्याची १६ ऑगस्टला पाहणी केली. श्री. टोपे हे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असून, त्यांनी “समर्थ’च्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना घेऊनही …
 
जिजामाता साखर कारखाना सुरू करण्याच्‍या हालचाली; “समर्थ’च्‍या टोपेंना घेऊन पालकमंत्री “ॲक्‍शन’ मोडमध्ये!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तांत्रिक अडचणींमुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेला सिंदखेड राजा येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतला अाहे. यादृष्टीने त्‍यांनी आरोग्‍यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्‍यासह नुकतीच कारखान्याची १६ ऑगस्‍टला पाहणी केली. श्री. टोपे हे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असून, त्‍यांनी “समर्थ’च्‍या तांत्रिक कर्मचाऱ्यांना घेऊनही ही भेट दिली. कारखान्याची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचनाही त्‍यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. लवकरच यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्‍हणाले. हा कारखाना भाडेतत्‍वावर किंवा थेट विकत घेऊन सुरू करण्याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. सध्या हा कारखाना राज्‍य सहकारी बँकेच्‍या ताब्‍यात आहे.

५० वर्षे जुना हा कारखाना १९७२ मध्ये अप्पासाहेब देशमुख यांनी सुरू केला होता. केवळ चार कोटी रुपयांचे भागभांडवल यासाठी लागले होते. दोनेक वर्षे कारखाना सुरू राहिल्यानंतर ११ वर्षे हा कारखाना केंद्र सरकारने नियुक्‍त केलेल्या प्रशासकाच्‍या ताब्‍यात होता. १९९८ मध्ये राजेंद्र शिंगणे चेअरमन झाल्यानंतर २०११ पर्यंत त्‍यांनी कारखाना यशस्वीरित्या चालवला. त्‍यानंतर उद्योजक विनय कोठारी यांनी हा कारखाना घेतला होता, मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्‍यांनी लगेच सोडचिठ्ठीही दिली. आता पुन्‍हा एकदा डॉ. शिंगणे हा कारखाना सुरू करण्याच्‍या हालचाली करत आहेत.

या परिसरात सध्या वीज, पाणी, रस्‍ते या सुविधा पुरेशा आहेत. ऊसही मोठ्या प्रमाणावर उपलब्‍ध होऊ शकतो. त्‍यामुळे कारखाना सुरू झाला तर हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. त्‍यामुळे पालकमंत्री पुन्‍हा एकदा कारखान्याची घरघर सुरू करण्याच्‍या बेतात आहेत. कारखान्याकडे सध्या २५ कोटी रुपयांची देणी आहे. कामगारांचे पगार, पीएफही थकीत आहे. गाळप क्षमतेत सध्याच्‍या कारखान्यांपेक्षा कमी आहे. बाराशे टन उसाचे गाळप हा कारखाना करू शकेल.