जिनिंगमध्ये काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीस पळवले!; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिनिंगमध्ये मजुरीचे काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीस युवकाने पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगी 18 मार्चला मलकापूर येथील विरचंद नरसी कॉटन प्रा.लि. मध्ये मजुरीच्या कामास गेली होती. जिनमध्येच काम करणाऱ्या सागर माणिक इंगळे (रा. धरणगाव) याने तिला मोटारसायकलवर …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिनिंगमध्ये मजुरीचे काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीस युवकाने पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्‍या आईने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलगी 18 मार्चला मलकापूर येथील विरचंद नरसी कॉटन प्रा.लि. मध्ये मजुरीच्‍या कामास गेली होती. जिनमध्येच काम करणाऱ्या सागर माणिक इंगळे (रा. धरणगाव) याने तिला मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. मुकादम गजानन राजपूत यांनी मुलीच्‍या घरी तसे फोन करून सांगितले. त्‍यानंतर मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर पोलिसांत तक्रार देण्यात आली. मुलगी आढळल्‍यास मलकापूर शहर पोलीस ठाण्यात 07267-222018 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.