जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला धनगर समाजाचा मोर्चा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ज्ञानगंगा अभयारण्यात हवेत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया मल्हार सेना व धनगर समाजातर्फे आज, २३ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एमपीएससी परीक्षेत धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण द्यावे. मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून वन …
 
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला धनगर समाजाचा मोर्चा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ज्ञानगंगा अभयारण्यात हवेत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया मल्हार सेना व धनगर समाजातर्फे आज, २३ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

एमपीएससी परीक्षेत धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण द्यावे. मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून वन चराई पासेस देण्यात याव्या. बोराखेडी व हिवरखेड पोलीस ठाण्यात मेंढपाळांविरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. धनगर समाजाला पशुपालन योजनेचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. गांधी भवनातून काढलेल्या या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेचे प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे, शरद वसतकर, धनश्री काटीकर, वैजीनाथ पावडे, गिता सोनोने, उषाताई चाते यांनी संबोधित केले.

मोर्चा आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल
धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका शहर पोलिसांनी ठेवला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नंदू लवंगे यांच्यासह २० ते २५ जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.