जिल्हाधिकारी पुन्‍हा रस्त्यावर; दुकानदाराला 5 हजारांचा दंड, काही दुकानांचे काढले फोटो

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र काही व्यापारी हे निर्देशांचा भंग करत असल्याचे लक्षात येताच स्वतः जिल्हाधिकारीच आज, 9 एप्रिलला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. सर्क्युलर रोडवरील चिंचोले चौक परिसरात उघड्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र काही व्यापारी हे निर्देशांचा भंग करत असल्याचे लक्षात येताच स्वतः जिल्हाधिकारीच आज, 9 एप्रिलला पुन्‍हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. सर्क्युलर रोडवरील चिंचोले चौक परिसरात उघड्या असलेल्या बाफना सेल्स कार्पोरेशनला जिल्हाधिकाऱ्यांनी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या सोबतच रस्त्यावरील काही दुकानांचेही फोटो जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने आणखी काही दुकानांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. स्वतः जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरल्याने नगरपालिका आणि पोलीस प्रशासनही आता दक्ष झाले आहे.