जिल्हाधिकारी रस्‍त्‍यावर! 9 दुकानदारांना ठोठावला दंड!! व्यावसायिकांत खळबळ

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः ब्रेक दी चेन मोहिमेत जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबाजवणी करण्यासाठी आज, 6 एप्रिलला दस्तुरखुद्ध जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले! त्यांनी 9 दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी काल 5 एप्रिल रोजी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी लागू करून विविध निर्बंध जारी केले. याचे उल्लंघन होणार नाही याची …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः ब्रेक दी चेन मोहिमेत जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबाजवणी करण्यासाठी आज, 6 एप्रिलला दस्तुरखुद्ध जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले! त्यांनी  9  दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.

जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी काल 5 एप्रिल रोजी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी लागू करून विविध निर्बंध जारी केले. याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे व कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांना केले. आज लिडींग फ्रॉम द फ्रंट या तत्त्वानं त्यांनी कारवाईचा बडगा उचलला. त्यांनी जयस्तंभ चौक, मेन रोड, जनता चौक, कारंजा चौक परिसर ते थेट चिखली मार्गावरील मार्केट, दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्सची पाहणी केली. यावेळी परवानगी नसताना दुकाने उघडी ठेवणाऱ्या 9 दुकानदारांना त्‍यांनी प्रत्येकी 2 हजारांप्रमाणे 18 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे व अन्य कर्मचारी हजर होते.