जिल्हाधिकाऱ्यांकडून सिंदखेड राजात ऐतिहासिक स्थळांची पाहणी

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील ऐतिहासिक स्मारकाची पाहणी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा लवकरच हाेणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट दिली. चांदणी तलाव, मोती तलाव, राजे लखोजीराव जाधव यांची समाधी, नीलकंठेश्वर मंदिर, सावकार वाडा, राजवाड्यासह ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छतेची त्यांनी माहिती घेतली व …
 
जिल्हाधिकाऱ्यांकडून सिंदखेड राजात ऐतिहासिक स्थळांची पाहणी

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील ऐतिहासिक स्मारकाची पाहणी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा लवकरच हाेणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट दिली.

चांदणी तलाव, मोती तलाव, राजे लखोजीराव जाधव यांची समाधी, नीलकंठेश्वर मंदिर, सावकार वाडा, राजवाड्यासह ऐतिहासिक स्थळांच्‍या स्वच्छतेची त्‍यांनी माहिती घेतली व पाहणी केली. या वास्तूंचे जतन व विकास करण्याच्या दृष्टीने सरकारदरबारी निधीचा प्रस्ताव पडून असल्याने यासंदर्भात मागील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी दौरा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाला चालना देण्यात आली आहे. याची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी पाहणी दौरा केला. यावेळी सिंदखेड राजा नगराध्यक्ष सतीश तायडे, नियोजन समितीचे सदस्य ॲड. नाझेर काझी, विजय तायडे, जगन सहाने, योगेश म्हस्के, बालाजी मेहेत्रे, शेख यासीन, शहाजी चौधरी, सिंदखेड राजाचे तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी प्रशांत हटकर, गटविकास अधिकारी कृष्णा वेणीकर उपस्थित होते.