जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश… कोरोनाबाधितांसाठी गृह अलगीकरण नाहीच!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोविड 19 या संसर्गजन्य आजाराचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील कोविड 19 बाधित रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण गृह अलगीकरण झाल्यानंतर अलगीकरणात न राहता गावात मुक्त संचार करत असल्याने ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामीण भागामध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्याचे …
 
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश… कोरोनाबाधितांसाठी गृह अलगीकरण नाहीच!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः  जिल्ह्यात कोविड 19 या संसर्गजन्य आजाराचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील कोविड 19 बाधित रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण गृह अलगीकरण झाल्यानंतर अलगीकरणात न राहता गावात मुक्त संचार करत असल्याने ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामीण भागामध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यांच्याद्वारे ग्रामीण भागात आयसोलेशन केंद्र उभारून कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपायोजनेचा भाग म्हणून शहरी व ग्रामीण भागातील ज्या कोविड बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यांना गृह अलगीकरण हा पर्याय न देता त्यांना सोयीस्कर अशा संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही स्वरुपात गृह अलगीकरण राहण्याकरिता परवानगी देण्यात येऊ नये. जेणेकरून कोविड बाधित रुग्णांपासून इतरांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत.