जिल्हाभर “विहिंप’, वारकरी सांप्रदायाचे राज्य शासनाविरोधात भजन आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्‌ पूजेसाठी पंढरपुरात न येण्याची केली मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वारी विरोध, वारकऱ्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान व जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजरकैदेचा निषेध म्हणून आज, १७ जुलैला विश्व हिंदू परीषद व वारकरी सांप्रदायातर्फे जिल्हाभर भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ठिकठिकाणच्या तहसीलदारांना निषेध आणि मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भर रस्त्यात वारकऱ्यांचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वारी विरोध, वारकऱ्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान व जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजरकैदेचा निषेध म्हणून आज, १७ जुलैला विश्व हिंदू परीषद व वारकरी सांप्रदायातर्फे जिल्हाभर भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ठिकठिकाणच्या तहसीलदारांना निषेध आणि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपरिक गणवेश उतरवायला लावणे, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणे. संत, महाराजांना अटक करणे, त्यांना अपराध्याची वागणूक देणे, जागोजागी वारकऱ्यांची अडवणूक करणे, त्यांच्यावर प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे हे निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्‍हटले आहे.

ज्‍येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे. त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे. आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रातील विविध भागांत विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने, दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावे. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागावी व या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी शासकीय पुजेसाठी पंढरपुरात येऊ नये, अशी मागणीही निवेदनात केली आहे. जिल्हाभर देण्यात आलेल्या निवेदनांच्या वेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वारकरी महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.