जिल्हा आरोग्‍य अधिकाऱ्यांची बदली, पुण्याला जाणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांची पुण्याला बदली झाली आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात संशोधन अधिकारी म्हणून ते रूजू होणार आहेत. कोरोनाचे संकट गडद असताना जिल्ह्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावत कोरोना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी कंबर कसली होती. दोन दिवसांत ते पुण्याला जाणार आहेत. त्यांच्या जागी कोण येणार हे अद्याप …
 
जिल्हा आरोग्‍य अधिकाऱ्यांची बदली, पुण्याला जाणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांची पुण्याला बदली झाली आहे. राज्‍य कुटुंब कल्याण कार्यालयात संशोधन अधिकारी म्‍हणून ते रूजू होणार आहेत. कोरोनाचे संकट गडद असताना जिल्ह्यात त्‍यांनी मोलाची कामगिरी बजावत कोरोना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी कंबर कसली होती. दोन दिवसांत ते पुण्याला जाणार आहेत. त्‍यांच्‍या जागी कोण येणार हे अद्याप निश्चित नसून, याबद्दल आता आरोग्‍य यंत्रणेत उत्‍सुकता वाढली आहे.