जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर वृद्ध कर्मचार्‍यांचा टाहो!; अधिकारी भांबावले

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद पडलेल्या दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचार्यांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालसमोर आज, 27 जानेवारीला सकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. देणी त्वरित देण्यात येईल, असे लिखित आश्वासन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद पडलेल्या दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचार्‍यांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालसमोर आज, 27 जानेवारीला सकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. देणी त्वरित देण्यात येईल, असे लिखित आश्‍वासन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल सहा तास सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी कर्मचार्‍यांच्या टाहोने अधिकारीही भांबावून गेले होते.

कारखाना बंद पडलेला नसून तो बंद पाडण्यात आल्याचा आरोप कामगारांनी यावेळी केला. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला देण्यात यावेत अशी मागणी करत वृद्ध आणि विधवा महिलांचा आक्रोश सुरू होता.


कामगाराने दाखवली मेडिसिन
आम्ही वृद्ध आहोत,आजारपणासाठी पैसे नाहीत, दवाखान्याचा प्रश्‍न आहे हे सांगताना एका कामगाराने सोबत आणलेली औषधी जमिनीवर टाकत दाखवली. दरम्यान एका वृद्ध महिलेला चक्कर आल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.