जिल्हा कचेरीतील 3 कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह!, 97 जण ठरले सुदैवी!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यापैकी तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले! मात्र तब्बल 97 कर्मचारी निगेटिव्ह निघाल्याने व संख्या कमी आल्याने वरिष्ठांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडल्याचे चित्र आहे. यापूर्वी कोरोना योद्धा ठरलेले निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे एप्रिल मध्यानंतर कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय हादरले! तसेच …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यापैकी तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले! मात्र तब्बल 97 कर्मचारी निगेटिव्ह निघाल्याने व संख्या कमी आल्याने वरिष्ठांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडल्याचे चित्र आहे.

यापूर्वी कोरोना योद्धा ठरलेले निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे एप्रिल मध्यानंतर कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्‍न झाले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय हादरले! तसेच दैनंदिन कामकाज प्रामुख्याने कोरोनविषयक कामकाजावर परिणाम झाला. यामुळे दक्षतेचा भाग म्हणून जिल्हा कचेरीतील 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 20 एप्रिल रोजीच कार्यालयातच स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. प्रयोगशाळेला 22 एप्रिलला दुपारी ते प्राप्त झाले.  या नमुन्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालानुसार 100 पैकी 3 कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये दोघा पुरुष तर एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ही बाब दुर्दैवी असली तरी सध्याचा 13 ते 14 टक्के हा पॉझिटिव्ही रेट (बाधित होण्याची टक्केवारी) लक्षात घेता अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तसेच यामुळे 97 टक्के कर्मचारी स्वतःची काळजी आणि  कोरोनाविषयक निर्देश व नियमांचे काटेकोर पालन करीत असल्याचे अप्रत्यक्षपणे सिद्ध झाले आहे.

…आणि निर्देश

दरम्यान, ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व 13 तहसीलदार, 6 उपविभागीय अधिकारी व प्रभारी अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर वा रॅपिड तपासणी करून घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.