जिल्हा कोरोनामुक्‍त नव्‍हे, मुक्‍त होण्याच्‍या वाटेवर!; आज नव्‍या 55 बाधितांची भर, 257 रुग्‍णांवर अजून सुरू आहेत उपचार, मोताळ्याच्‍या महिलेसह केसापूरच्‍या पुरुषाचा कोरोनाने मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा कोरोनामुक्त झालेला नसून, मुक्त होण्याच्या वाटेवर आहे. कालपासून जिल्हा कोरोनामुक्त झाल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, 14 जूनला नव्या 55 पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली असून, आता एकूण 257 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाने आणखी दोन बळी घेतले असून, उपचारादरम्यान मोताळा येथील …
 
जिल्हा कोरोनामुक्‍त नव्‍हे, मुक्‍त होण्याच्‍या वाटेवर!; आज नव्‍या 55 बाधितांची भर, 257 रुग्‍णांवर अजून सुरू आहेत उपचार, मोताळ्याच्‍या महिलेसह केसापूरच्‍या पुरुषाचा कोरोनाने मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा कोरोनामुक्‍त झालेला नसून, मुक्‍त होण्याच्‍या वाटेवर आहे. कालपासून जिल्हा कोरोनामुक्‍त झाल्याच्‍या अफवा पसरत आहेत. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, 14 जूनला नव्‍या 55 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची जिल्ह्यात भर पडली असून, आता एकूण 257 रुग्‍ण रुग्‍णालयात उपचार घेत आहेत. दरम्‍यान, कोरोनाने आणखी दोन बळी घेतले असून, उपचारादरम्यान मोताळा येथील 70 वर्षीय महिला, केसापूर (ता. बुलडाणा) येथील 45 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2118 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2063 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 46 व रॅपीड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1305 तर रॅपिड टेस्टमधील 758 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2063 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : भडगाव 1, मलकापूर तालुका : वाकोडी 1, सिंदखेड राजा तालुका : किनगाव राजा 2, कुंबेफळ 1, संग्रामपूर तालुका : बोरखेड 1, देऊळगाव राजा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : नारायणखेड 1, पांगरी 1, पिंपळगाव चि. 4, जांभोरा 2, खामगाव शहर : 8, खामगाव तालुका : गोंधनापूर 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : अंबाशी 1, रस्तळ 1, इसोली 1, सातगाव भुसारी 1, शेगाव शहर : 3, शेगाव तालुका : मनसगाव 3, गोळेगाव 1, जानोरी 1, पलोदी 1, भोनगाव 1, पळशी 1, मेहकर तालुका : खामखेड 1, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : येवती 1, आरडव 1, परजिल्हा चिंचबा ता रिसोड 1, जाफराबाद 2, नागड (ता. बाळापूर) 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रुग्ण आढळले आहेत.

106 रुग्‍णांना डिस्‍चार्ज
आज 106 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 531630 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85102 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 764 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86008 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयात 257 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 649 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.