जिल्हा न्यायाधीश स्वप्नील खटी म्हणाले, गरजूंना योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनातर्फे जनहिताच्या बऱ्याच योजना चालू आहेत. मात्र नागरिकांना त्याची फारशी माहिती मिळतेच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाला योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होताना योजनांपासून कुणीही वंचित राहता कामा नये, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, …
 
जिल्हा न्यायाधीश स्वप्नील खटी म्हणाले, गरजूंना योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनातर्फे जनहिताच्या बऱ्याच योजना चालू आहेत. मात्र नागरिकांना त्याची फारशी माहिती मिळतेच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाला योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होताना योजनांपासून कुणीही वंचित राहता कामा नये, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती बुलडाणा व बुलडाणा नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज, १४ ऑक्टोबर रोजी समाज कल्याण कार्यालयात “आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त शासकीय सेवा योजना मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनीदेखील उपस्थिताना मार्गदर्शन केले. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटूंब आर्थिक सहाय्य योजना, ग्रामीण जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, दीनदयाळ अंत्योदय योजना अशा विविध योजनांच्या १ हजार लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र व धनादेश वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार रुपेश खंडारे, नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर गणेश खुपसे, विवेक राजूरकर, मेघा ताजुक्का उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली तायडे यांनी केले. आभार मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी मानले.