जिल्हा परिषदेच्‍या बांधकाम विभागात मनोज दांडगे यांचा ठिय्या! अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांची व खर्चाची माहिती देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी बांधकाम अभियंत्यांच्या दालनातच आज, 15 मार्चला ठिय्या मांडला होता. अखेर महिनाभरात ही सर्व माहिती देण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने ठिय्या आंदोलन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांची व खर्चाची माहिती देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी बांधकाम अभियंत्यांच्या दालनातच आज, 15 मार्चला ठिय्या मांडला होता. अखेर महिनाभरात ही सर्व माहिती देण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.


मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे कागदावर पूर्णत्वास गेलेल्या विकासकामांच्या संपूर्ण खर्चाचा अहवाल जनहितार्थ प्रकाशित करण्यात यावा या मागणीसाठी श्री. दांडगे यांनी नोव्हेंबर 2020 पासून आतापर्यंत 5 निवेदने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली आहेत. अनेकदा अधिकाऱ्यांना भेटूनही मागणी केली होती. मात्र कोणत्याही प्रकारची माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली नव्हती. 15 दिवसांत माहिती उपलब्ध करून न दिल्यास दालनातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मनोज दांडगे यांनी 30 मार्च रोजी दिला होता. त्यामुळे आज सकाळीच मनोज दांडगे यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातच ठिय्या मांडला. दांडगे यांच्या आक्रमक पावित्र्याने जिल्हा परिषद प्रशासनाची भंबेरी उडाली. अखेर माहिनाभरात सर्व माहिती उपलब्ध करून देऊ, असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने दांडगे यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी दांडगे यांच्यासोबत चिखली तालुका व्‍हीजेएनटी सेलचे अध्यक्ष सुनील सुरडकर, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ वाघ आंदोलनात सहभागी होते.