जिल्हा परिषदेतर्फे बुलडाण्यात 50 खाटांचे कोविड केअर सेंटर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषदेतर्फे 50 खाटांचे कोविड केअर सेंटर बुलडाण्यात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्रात हे अद्ययावत सेंटर 2-3 दिवसांत सुरू होईल. जिल्ह्यात सध्या कोरोनाने कहर केला असून, रुग्णसंख्या 68 हजार पार गेली आहे. अशा स्थितीत सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी …
 
जिल्हा परिषदेतर्फे बुलडाण्यात 50 खाटांचे कोविड केअर सेंटर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषदेतर्फे 50 खाटांचे कोविड केअर सेंटर बुलडाण्यात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री विसपुते यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्रात हे अद्ययावत सेंटर 2-3  दिवसांत सुरू होईल.

जिल्ह्यात सध्या कोरोनाने कहर केला असून, रुग्‍णसंख्या 68 हजार पार गेली आहे. अशा स्‍थितीत सीईओ भाग्‍यश्री विसपुते यांनी विभागप्रमुखांच्‍या सहकार्याने कोविड सेंटर सुरू करण्याचा ठराव मांडला. या प्रस्‍तावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली. तूर्त 50 खाटांचे रुग्‍णालय होणार असले तरी पुढच्‍या काळात खाटांची संख्या वाढविण्यात येईल. या सेंटरमध्ये जिल्हा परिषदेच्‍या फ्रंटलाइन कर्मचारी व त्‍यांच्‍या नातेवाइकांना प्राधान्य देणार आहे. मोफत जेवणाची व्‍यवस्‍था केली जाणार असून, अत्यावश्यक औषधे, साहित्‍य, वैद्यकीय मनुष्यबळाची व्‍यवस्‍था करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्‍ताव सादर केला आहे, अशी माहिती सीईओ भाग्‍यश्री विसपुते यांनी दिली.