जिल्हा पावणे नवशेच्या पल्याड; बुलडाणा तालुका दोनशेच्या घरात! 9 तालुक्यांतील कोविडचा हाहाकार कायम!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः कडक निर्बंध, अत्यावश्यक सेवांनाही मिळालेली अत्यल्प वेळ आणि काल, 21 एप्रिलच्या रात्रीपासून सोशल मीडियावर वर्तविण्यात येणारी दीर्घ व आणखी कडक लॉकडाऊनची धक्कादायक चर्चा या पार्श्वभूमीवर आज, 22 एप्रिलला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 879 च्या घरात पोहोचला! यात 3 तालुक्यांचे भरीव योगदान असून, 9 तालुक्यातील प्रकोप कायमच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सरत्या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः कडक निर्बंध, अत्यावश्यक सेवांनाही मिळालेली अत्यल्प वेळ आणि काल, 21 एप्रिलच्‍या रात्रीपासून सोशल मीडियावर वर्तविण्यात येणारी दीर्घ व आणखी कडक लॉकडाऊनची धक्कादायक चर्चा या पार्श्वभूमीवर आज, 22 एप्रिलला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 879 च्या घरात पोहोचला! यात 3 तालुक्यांचे भरीव योगदान असून, 9 तालुक्यातील प्रकोप कायमच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सरत्या 24 तासांत तिघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या साडेतीनशेच्या पल्याड गेली आहे.

बुलडाणा तालुक्याचा पिच्छा सोडायला कोविडकुमार तयारच नाय! गत्‌ 24 तासांत तालुक्यात तब्बल 195 पॉझिटिव्ह निघाले आहेत. काही दिवस ब्रेक घेऊन पुन्हा परतलेल्या कोरोनाचे चिखली तालुक्यात 114, मेहकरात 100, सिंदखेडराजात  104 रुग्ण निघाले आहेत. इतर तालुके फार मागे आहे असे  नाहीच. शेगाव 63, नांदुरा 70, लोणार 60, मोताळा 63, खामगाव 48 अशी ही आकडेवारी आहे. संग्रामपूर तालुक्यात आता पॉझिटिव्ह सापडायला सुरुवात झाली असून, आज 22 रुग्णांची नोंद झाली. या तुलनेत देऊळगाव राजा 18, मलकापूर 3, जळगाव जामोद 19  या तालुक्यांत तूर्तास तरी  कोरोनाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.

अबतक 356

दरम्यान, काल 12 जणांचे मृत्यू झाल्याने जिल्हा हादरला होता. गत्‌ 24 तासांत केवळ 3 बळींची नोंद झाली. बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील हे रुग्ण आहेत. यामुळे आजवरच्या बळींची संख्या 356 पर्यंत गेली आहे.