जिल्हा पोलीस दलाच्‍या ताफ्‍यात नव्‍या 16 बोलेरो, 19 दुचाकी दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या 16 बोलेरो जीप आणि 19 दुचाकी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दाखल झाल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 1 कोटी 25 लाख 25 हजार रुपयांचा निधी दिला होता. सकाळी पोलीस मैदानावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या नव्या वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलाच्‍या ताफ्यात नव्‍या 16 बोलेरो जीप आणि 19 दुचाकी गुढीपाडव्‍याच्‍या शुभमुहूर्तावर दाखल झाल्‍या आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 1 कोटी 25 लाख 25 हजार रुपयांचा निधी दिला होता.

सकाळी पोलीस मैदानावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या नव्या वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक  बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्‍यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुचाकी वाहनांचे पासिंग झाले असून, पुढील 1 ते 2 दिवसांत चारचाकी वाहनांचे पासिंग झाल्यानंतर वाहने विविध पोलीस ठाण्यांना वितरित करण्यात येतील.