जिल्हा रुग्णालयातून… मोटार चालू करायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सर्पदंशामुळे सात जणांवर उपचार सुरू; १७ वर्षीय मुलीला चावला मण्यार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना वालसावंगी (ता. भोकरदन, जि. जालना) येथे आज, १६ जुलैला सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. बुलडाणा जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी आणले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गजानन सुधाकर भाले (३५, रा. वालसावंगी) असे या शेतकऱ्याचे नाव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना वालसावंगी (ता. भोकरदन, जि. जालना) येथे आज, १६ जुलैला सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. बुलडाणा जिल्हा रुग्णालयात त्‍यांना उपचारासाठी आणले होते. मात्र त्‍यापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गजानन सुधाकर भाले (३५, रा. वालसावंगी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

भाले हे आज सकाळी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या महेश सुनील भाले (१७) सोबत होता. मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का लागून बाजूला फेकले गेले. पुतण्या महेशने तात्काळ ही बाब गावात कळवली व उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले होते. भाले यांच्या पश्चात पत्नी, दोन चिमुकल्या मुली आहेत.

सर्पदंश झालेल्या ७ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
पावसाळ्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतातील पिकांत काम करताना साप चावण्याच्या घटना घडत आहेत. आज १६ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात सर्पदंश झालेल्या ७ रुग्णांवर उपचार सुरू होते. १७ वर्षीय मुलीला शेतात खुरपणी करत असताना मण्यार या विषारी सापाने चावा घेतला. शेलूद (ता. भोकरदन) येथे दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. दुर्गा कृष्णा बारोटे मकाच्या शेतात आई-वडिलांसह खुरपणी करत होती. तिच्या हाताला अचानक मण्यार सापाने चावा घेतला. तिला लगेच बुलडाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.