जिल्हा रुग्‍णालयातून…. शेतात काम करताना तरुण शेतकऱ्याला चावला साप!; दुचाकी स्लीप झाल्याने जावई गंभीर जखमी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात काम करताना तरुण शेतकऱ्याला साप चावला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. आज, १३ जुलै रोजी नागझरी(ता. खामगाव) येथे घटना घडली. सागर हिरालाल मोहिते (रा. नागझरी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दुचाकी स्लीप …
 
जिल्हा रुग्‍णालयातून…. शेतात काम करताना तरुण शेतकऱ्याला चावला साप!; दुचाकी स्लीप झाल्याने जावई गंभीर जखमी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतात काम करताना तरुण शेतकऱ्याला साप चावला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्‍याला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्‍णालयात भरती केले आहे. आज, १३ जुलै रोजी नागझरी(ता. खामगाव) येथे घटना घडली. सागर हिरालाल मोहिते (रा. नागझरी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दुचाकी स्लीप झाल्याने जावई गंभीर जखमी; मोताळा तालुक्यातील घटना
सासरवाडीला पत्नीला आणायला निघालेल्या जावयाची मोटारसायकल घसरली. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज, १३ जुलैला दुपारी बोराखेडी (ता. मोताळा) येथे घडली. भारत दशरथ तायडे (२७, रा. कुंड ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो पत्नीला आणण्यासाठी बोराखेडीला जात होता. दुपारी एकच्‍या सुमारास मलकापूर- बुलडाणा रोडवर बोराखेडी गावाजवळ त्याची दुचाकी स्लिप झाली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून, प्रकृती चिंताजनक आहे.