जिल्हा सामान्य रुग्‍णालयात टेंडर घोटाळा?; जिल्हा आरोग्‍य अधिकाऱ्यासह तत्‍कालिन शल्य चिकित्‍सकांवर गंभीर आरोप!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचे टेंडर मॅनेज करून अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार मालामाल झाल्याचा आरोप एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडेकर यांनी केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुख्य औषध निर्माण अधिकारी सतीश चोपडे यांनी यापूर्वी निविदा क्रमांक 494450 तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या डिजिटल स्वाक्षरीने खासगी पोर्टलवर ऑनलाइन प्रसिद्ध करून मर्जितल्या कंत्राटदारांना …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा सामान्य रुग्णालयात  करोडो रुपयांचे टेंडर मॅनेज करून अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार मालामाल झाल्याचा आरोप  एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडेकर यांनी केला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुख्य औषध निर्माण अधिकारी सतीश चोपडे यांनी यापूर्वी निविदा क्रमांक 494450 तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्‍या डिजिटल स्वाक्षरीने खासगी पोर्टलवर ऑनलाइन  प्रसिद्ध करून मर्जितल्या कंत्राटदारांना टेंडर भरण्यास सांगितले. कोणतेही कारण नसताना कमी दराने टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही टेंडर रद्द केले. वास्तविक पाहता टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक वर्ष कंत्राटदार टेंडरशी बांधील असतो. परंतु त्याच कंत्राटदाराकडुन पुन्हा रद्द झालेल्या निविदा दुसऱ्या क्रमांकाने खासगी ऑनलाईन पोर्टलवर टाकण्यात आली. निविदा क्र. 575248 ही दुसरी निविदा डॉ. बाळकृष्ण कांबळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने खासगी पोर्टलवर प्रसिद्ध करून त्याच कंत्राटदाराकडुन 15%दर जास्तीचे भरून औषधी सप्लाय करण्याच्या ऑर्डर देऊन शासनाच्या करोडो रुपयाचा अपहार करताना तत्कालिन जिल्हा चिकीत्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे व कंत्राटदार यांनी संगनमत करून करोडो रुपयांचा अपहार केला.असे निवेदनात म्हटले आहे.

टेंडर हे सरकारी ऑनलाइन पोर्टलवर टाकणे आवश्यक आहे. जेणेकरून जास्तीत जास्त कंत्राटदारांनी भाग घेतल्यास कमीत कमी दराने टेंडर भरता आले पाहिजे. परंतु तसे न करता खासगी पोर्टलवर टेंडर टाकून आवश्यक त्याच मर्जीतल्या कंत्राटदारांना टेंडर भरता यावे व लाखो करोडो रूपये आपल्या घशात घालता यावेत यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले,असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.  टेंडर प्रकिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार साहित्य पुरवठा करत नसेल तर त्याची अनामत रक्कम जप्त करून त्याला  काळ्या यादीत टाकणे क्रमप्राप्त ठरते. मात्र श्री.चोपडे हे 30 एप्रिल 2021ला सेवानिवृत्त होत असल्याने लाखो करोडोंचा भ्रष्टाचार  करून निवळ पैसे कमविणे या एकमेव हेतूने प्रेरित झाले आहेत, असा खळबळजनक आरोप शैलेश खेडेकर यांनी केला आहे . संगनमत करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना निलंबित करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी संचालक मुंबई उपसंचालक अकोला व जिल्हाअधिकारी बुलडाणा यांना  निवेदनाव्दारे केली आहे.