जिल्ह्यातील चार कोविड रुणालये बंद; शासनाकडून दर निश्चित होताच कळवले, कारण दिले कमी रुग्‍णांचे..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही खासगी कोविड हॉस्पिटल्सनी रुग्णांची लूट सुरू केल्याने शासनाने त्यांना चाप लावण्यासाठी अ, ब, क वर्गनिहाय शहर व जिल्ह्यासाठी दर निश्चिती करून दिली. हे आदेश धडकताच जिल्ह्यातील 4 खासगी कोविड रुग्णांनी आपले कोविड केंद्र बंद केले आहे. यासाठी रुग्ण घटल्याचे कारण दिले आहे. मात्र चर्चा काही वेगळीच आहे. बुलडाणा जिल्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काही खासगी कोविड हॉस्पिटल्सनी रुग्‍णांची लूट सुरू केल्याने शासनाने त्‍यांना चाप लावण्यासाठी अ, ब, क वर्गनिहाय शहर व जिल्ह्यासाठी दर निश्चिती करून दिली. हे आदेश धडकताच जिल्ह्यातील 4 खासगी कोविड रुग्‍णांनी आपले कोविड केंद्र बंद केले आहे. यासाठी रुग्‍ण घटल्‍याचे कारण दिले आहे. मात्र चर्चा काही वेगळीच आहे.

बुलडाणा जिल्हा क वर्गात येत असून, जिल्ह्यातील वॉर्डमधील नियमित विलगीकरणसाठी ( प्रति दिवस) २४०० रुपये. यात आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश आहे. व्हेंटिलेटरसह आयसीयू व विलगीकरणसाठी ५४०० रुपये, केवळ आयसीयू व विलगीकरणसाठी ४५०० रुपये प्रतिदिवस दर आकारण्यात येऊ शकतो. वास्‍तव असे आहे की जिल्ह्यातील काही कोविड हॉस्पिटल्स चरायला कुरण मिळाल्‍यासारखे रुग्‍णांकडून याच सेवेसाठी दुप्पट आकारत आहेत. अनेकांना तर बिलेही मिळत नसल्याच्‍या तक्रारी आहेत. खामगाव येथील अश्विनी, मेहकर येथील डॉ. राठोड, नांदुरा येथील डॉ. रामचंदानी, शेगाव येथील गजानन यांनी आपले कोविड सेंटर बंद करत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

आता लक्ष ठेवण्याची गरज…
चार रुग्‍णालयांनी कोविड सेंटर बंद केले असले तरी तिथे कोविड रुग्‍णांवर उपचार यापुढेही होत आहेत का आणि ते कोणत्‍या दराने त्‍यांच्‍याकडून पैसे वसूल करत आहेत, याची वेळोवेळी तपासणी करण्याची गरज आहे. याशिवाय अन्य कोविड हॉस्पिटल्सकडूनही दरनिश्चितीनुसार आकारणी होते का, याची तपासणी करण्याची गरज आहे.