जिल्ह्यातील रुग्णालयांना 284 रेमडेसिवीरचे वितरण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनातर्फे 4 मे रोजी 284 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आज, 4 मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णालयांना बेड व रुग्ण संख्येनुसार वितरण केलेले रेमडेसिवीर असे ः बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 11 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 2, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनातर्फे 4 मे रोजी 284 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आज, 4 मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्‍या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

रुग्णालयांना बेड व रुग्ण संख्येनुसार वितरण केलेले रेमडेसिवीर असे ः बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 11 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 2, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 5, निकम हॉस्पीटल 4, जाधव पल्स हॉस्पीटल 5, सहयोग हॉस्पीटल 5, आशीर्वाद हॉस्पीटल 6, सिद्धीविनायक हॉस्पीटल 9, काटकर हॉस्पीटल 4, शिवसाई हॉस्पीटल 6, संचेती हॉस्पीटल 5, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 2, सोळंकी हॉस्पीटल 2, सावजी हॉस्पीटल 5, खरात हॉस्पीटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 0, सुश्रुत हॉस्पीटल 3, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 0, रेड्डी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 0,  चिखली : योगीराज हॉस्पीटल 17, हेडगेवार हॉस्पीटल 10, गुरूकृपा हॉस्पीटल 4, तायडे हॉस्पीटल 6, दळवी हॉस्पीटल 4, पानगोळे हॉस्पीटल 8, खंडागळे हॉस्पीटल 4, गंगाई हॉस्पीटल 3, जैस्वाल हॉस्पीटल 4, श्री गजानन हॉस्पिटल 2 , तुळजाई हॉस्पीटल 0,  मलकापूर : झंवर हॉस्पीटल 3, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 2, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 5,  राईट केअर हॉस्पीटल 3,  आशीर्वाद हॉस्पीटल 4, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 11, श्री गजानन कोविड हॉस्पीटल 0,  शेगाव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 5, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 5, शामसखा हॉस्पीटल 15,  खामगाव : चव्हाण हॉस्पीटल 3, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 9, श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 8, साई हॉस्पिटल 0 ,  मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 13, मापारी हॉस्पीटल 4, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 3, गोविंद क्रिटीकल 3, श्री गजानन हॉस्पीटल 8, अजंता हॉस्पीटल 3, मेहकर मल्टीस्पेशालीटी 7, राठोड हॉस्पिटल 2,  देऊळगाव राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 3, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 5, मी अँड आई हॉस्पीटल 3, सिंदखेड राजा : जिजाऊ हॉस्पीटल 6, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 0,  विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 5 असे एकूण 284 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शनची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शनचा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात आला आहे.  सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांकरिताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असेही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.