जिल्ह्यातील १३ नगरपालिका, २ नगरपंचायतींचे कामकाज ठप्प!; ठाण्याच्‍या मनपा सहाय्यक आयुक्तांसह बॉडीगार्डवर प्राणघातक हल्ल्याचे बुलडाण्यात पडसाद

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे व त्यांचे बॉडीगार्ड सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींमधील शेकडो संतप्त अधिकारी, कर्मचारी आज, 31 ऑगस्टला रस्त्यावर उतरले! त्यांनी कामबंद आंदोलन करून आरोपींविरुद्ध शीघ्र गतीने खटला चालवून कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी राज्य शासन व …
 
जिल्ह्यातील १३ नगरपालिका, २ नगरपंचायतींचे कामकाज ठप्प!; ठाण्याच्‍या मनपा सहाय्यक आयुक्तांसह बॉडीगार्डवर प्राणघातक हल्ल्याचे बुलडाण्यात पडसाद

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे व त्यांचे बॉडीगार्ड सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींमधील शेकडो संतप्त अधिकारी, कर्मचारी आज, 31 ऑगस्टला रस्त्यावर उतरले! त्यांनी कामबंद आंदोलन करून आरोपींविरुद्ध शीघ्र गतीने खटला चालवून कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी राज्य शासन व वरिष्ठांकडे केली आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील तेराही संस्थांमधील कामकाज ठप्प झाले.

कल्पिता पिंगळे या अंगरक्षक पालवे आणि अतिक्रमण विरोधी पथकासह काल, 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास अनधिकृत हातगाडी धारकांविरुद्ध कारवाई करत होत्या. दरम्यान आरोपी अमरजीत यादव याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याने पिंगळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे अक्षरशः तुटून पडली! तसेच उजव्या हाताचा अंगठा क्षतीग्रस्त होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच पालवे यांचे डाव्या हाताचे बोट तुटून पडले. या दोघांना प्रारंभी वेदांत व नंतर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. श्रीमती पिंगळे यांच्यावर 3 ऑपरेशन करून बोटे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पालवे यांचे बोट न सापडल्याने उपचारात अडचण आली असतानाही ऑपरेशन करण्यात आले.

दरम्यान या घटनेने राज्यातील सर्व पालिका कर्मचारी हादरून गेले असून, त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध म्हणून राज्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अमोल इंगळे, कार्याध्यक्ष पल्लवी शेळके, सचिव श्रीकांत कोल्हे यांनी कठोर कारवाईची मागणी केली. स्‍थानीय शाखेचे अध्यक्ष जगदेव कारले, सचिव गणेश मुळे, उपाध्यक्ष गजानन चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा पालिका कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना निवेदन दिले. यावेळी एकनाथ गोरे, प्रमोद सुस्ते, राजेश भालेराव यांच्यासह सुनिल बेंडवाल, गजेंद्र राजपूत, शंकर उमाळकर, गौतम आराख, पौर्णिमा सुस्ते, विश्वास इंगळे, रवींद्र जाधव, शेखर औशलकर, सुधीर दलाल, सुनील काळे, रवींद्र खानझोडे , अब्दुल नासिर अ. रजाक आदी कर्मचारी यावेळी हजर होते. त्यापूर्वी निदर्शने देखील करण्यात आली.