जिल्ह्यातील २५०० पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण; १८१ अधिकाऱ्यांचाही पुढाकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन फ्रंटलाईन वर्करला कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोरोनामुळे जिल्ह्यातील २ पोलीस कर्मचाऱ्यांनी जीव गमावला होता तर …
 
जिल्ह्यातील २५०० पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण; १८१ अधिकाऱ्यांचाही पुढाकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन फ्रंटलाईन वर्करला कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोरोनामुळे जिल्ह्यातील २ पोलीस कर्मचाऱ्यांनी जीव गमावला होता तर जवळपास साडे चारशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली होती. पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या कुटूंबांचे १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया आग्रही होते. त्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील १८८ पोलीस अधिकाऱ्यांपैकी १८१ जणांनी लस टोचून घेतली आहे. जिल्ह्यातील २६०४ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी २५००जणांचे लसीकरण झाले आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत लसीकरण झाले नाही, त्याला वैद्यकीय कारणे असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचेही लसीकरण लवकरच पूर्ण होणार आहे.