जिल्ह्यातील २८ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा!; जानेवारीतील पीक नुकसानीची भरपाई मिळाली!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अकाली पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील पिके- फळबागांना फटका बसला होता. याच्या नुकसान भरपाईचा निधी तब्बल ६ महिन्यांनंतर प्राप्त झाला. त्याचे वाटप जवळपास आटोपले असल्याने २८ हजारांवर बाधित शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सप्टेंबरमध्ये दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यावरील संकटांची मालिका चालू वर्षातही …
 
जिल्ह्यातील २८ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा!; जानेवारीतील पीक नुकसानीची भरपाई मिळाली!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अकाली पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील पिके- फळबागांना फटका बसला होता. याच्या नुकसान भरपाईचा निधी तब्बल ६ महिन्यांनंतर प्राप्त झाला. त्याचे वाटप जवळपास आटोपले असल्याने २८ हजारांवर बाधित शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सप्टेंबरमध्ये दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यावरील संकटांची मालिका चालू वर्षातही कायम राहिली. सन २०२१ च्या प्रारंभीच झालेल्या अकाली पावसाने व गारपिटीने ५ तालुक्यांना तडाखा दिला. यात लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये अतोनात नासाडी झाली. या तुलनेत चिखली व मेहकर तालुक्यात जेमतेम नासाडी झाली होती. या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र जवळपास ६ महिने लोटल्यावर ऑगस्टच्या उत्तरार्धात जिल्ह्याला २२ कोटी ७३ लाख ४३ हजार रुपयांचा निधी मिळाला. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती कक्षाचे नायब तहसीलदार संजय बनगाळे, अव्वल कारकून श्री. कन्‍नर यांनी ५ तालुक्यांना बिडीएसद्वारे निधी उपलब्ध करून दिला.

२८ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा
तपशील निहाय सांगायचे झाल्यास लोणार तालुक्यातील २६७७ शेतकऱ्यांना १ कोटी ९८ लाख ९५ हजार रुपये, देऊळगाव राजामधील २२ हजार १८० शेतकऱ्यांना १७ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपये तर सिंदखेड राजामधील ३९२३ शेतकऱ्यांना ३ कोटी २ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. चिखली तालुक्यातील ५ जणांना ४० हजार तर मेहकरमधील एकमेव शेतकऱ्यास १६ हजार रुपयांची मदत देण्यात आली.