जिल्ह्यातील 2 अट्टल दरोडेखोरांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेची गुजरातमध्ये कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरोडा, घरफोडी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला असे गुन्हे दाखल असलेल्या 2 अट्टल गुन्हेगारांना गुजरात राज्यातील सुरत येथून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गुजरात एसओजी पथकाच्या मदतीने ही कारवाई करून काल, 20 एप्रिलला रात्री दोघांना बुलडाणा येथे आणण्यात आले. राज उर्फ बबलू शेनफड शिंदे (27, रा. लोणी लव्हाळा, ता. मेहकर, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दरोडा, घरफोडी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला असे गुन्हे दाखल असलेल्या 2 अट्टल गुन्हेगारांना गुजरात राज्यातील सुरत येथून बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने ताब्यात घेतले. गुजरात एसओजी पथकाच्‍या मदतीने ही कारवाई करून काल, 20 एप्रिलला रात्री दोघांना बुलडाणा येथे आणण्यात आले. राज उर्फ बबलू शेनफड शिंदे (27, रा. लोणी लव्हाळा, ता. मेहकर, ह. मु. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा), राहुल उर्फ विकास राज भोसले (23, रा. किनगाव जट्टू ता. लोणार) अशी पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

गंभीर स्वरुपाचे गुन्हे आरोपींवर बाळापूर, साखरखेर्डा, मलकापूर, धरणगाव (जि. जळगाव) या पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. ते फरारी होते. गुजरात येथील सुरतमध्ये दोघे असल्याचा सुगावा एलसीबीला लागला होता. त्यानुसार 19 एप्रिलच्या रात्री गुजरात एसओजी पथकाच्‍या मदतीने एलसीबीने शिताफीने अटक केली. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोहेकाँ विलास काकड, श्रीकृष्ण चांदूरकर, नापोकाँ दीपक पवार, पोकाँ दीपक वायाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.