जिल्ह्यातील 53 पोलिसांना पदोन्‍नतीचं गुढीपाडवा गिफ्‍ट!; 14 जण होणार सहायक फौजदार, वाचा कुणाकुणाची झाली पदोन्नती!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 53 पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पदोन्नतीचं गुढीपाडवा गिफ्ट दिलं आहे. पोलीस हवालदार असलेल्या 14 जणांना सहायक फौजदार करण्यात आले असून, पोलीस नाईक असलेल्या 17 जणांना पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई असलेल्या 22 जणांना पोलीस नाईक करण्यात आले आहे. हे झाले सहायक फौजदार… (कंसात पदोन्नतीचं …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 53 पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्‍यदक्ष जिल्‍हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पदोन्‍नतीचं गुढीपाडवा गिफ्‍ट दिलं आहे. पोलीस हवालदार असलेल्या 14 जणांना सहायक फौजदार करण्यात आले असून, पोलीस नाईक असलेल्या 17 जणांना पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई असलेल्या 22 जणांना पोलीस नाईक करण्यात आले आहे.

हे झाले सहायक फौजदार… (कंसात पदोन्‍नतीचं पोलीस ठाणे)

शेख असलम शेख लाल (खामगाव ग्रामीण), जगन्‍नाथ गोविंद रौंदळे (शेगाव शहर), नामदेव रामचंद्र खवले (बुलडाणा शहर), मो. सुफीयान मो. सुलतान (रायपूर), मोहन धोंडूजी करूटले (खामगाव शहर), दीपक मल्लिकार्जुन क्‍यावल (कल्याण शाखा), कृष्णा महादेव चौधरी (पोलीस मुख्यालय बुलडाणा), मधुकर ओंकार महाजन (धामणगाव बढे), सुरेश शेषराव मांटे (अमडापूर), अलका त्र्यंबक सरदार (महिला व बाल अत्‍याचार प्रतिबंधक कक्ष बुलडाणा), द्रौपदी अशोक साळवे (बिबी), रवींद्र काशीराम वानखडे (बुलडाणा ग्रामीण), मनोहर कुंडलिक कोल्‍हे (नांदुरा), शिवाजी सोनाजी व्‍यवहारे (पोलीस मुख्यालय बुलडाणा). या सर्व पदोन्‍नती सेवा ज्‍येष्ठतेने झाल्या आहेत.

हे झाले पोलीस हवालदार

तय्यब अली खुर्शिद अली (जळगाव जामोद), सुनील पाटील (उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा), विनोद वानखडे (जळगाव जामोद), दीपक शंकरराव जायभाये (सिंदखेड राजा), गणेश किनगे (वाचक शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय), महादेव इंगळे (बुलडाणा शहर), गजानन विठोबा मांटे (बुलडाणा शहर), सुनील रामकृष्ण सिरसाठ (दविप अकोला), गजानन गुलाबराव नावकार (शिवाजीनगर खामगाव), सै. मुजीब सै. जैनुद्दीन (खामगाव शहर), रामचंद्र निवृत्ती पोफळे (शिवाजीनगर), रामेश्वर तुळशीराम राठोड (हिवरखेड), नवीन प्रमोद सोनवाणी (श्वानपथक बुलडाणा), मो. समीर शे. हमीद (मो.प.वि.बुलडाणा), दिलीप लक्ष्मणराव राठोड (डोणगाव), सुनील सुधाकरराव सूर्यवंशी (मेहकर), सुनील ओंकार पवार (गुअवि.बुलडाणा). या सर्व पदोन्नत्या सेवाज्‍येष्ठतेने झाल्या आहेत.

हे झाले पोलीस नाईक

सतीश तात्‍याराव मुळे (डोणगाव), दिनेशसिंह भगवानसिंह इंगळे (बुलडाणा ग्रामीण), विजय समाधान विरघट (पिंपळगाव राजा), ईश्वर बाबुराव हावरे (पो.मु.बुलडाणा), सचिन सुभाष गिते (बुलडाणा शहर), मो. साजीद शे. मकबूल (धामणगाव बढे), इम्रान अ. लतीफ (धाड), संतोष लक्ष्मण गाडे (तामगाव), संतोष विश्वनाथ सुरडकर (बोराखेडी), लक्ष्मण सरकटे (लोणार), भारत किसन जंगले (स्‍थागुशा.बुलडाणा), श्रीकांत चंद्रकांत चिटवार (रायपूर), विनोद पुंडलिक डाबेराव (तामगाव), विलास कोंडूबा चांडोळ (धामणगाव बढे), धर्मराज रामदास साखरे (जि.वानि.शाखा), राहुल गणपत दांडगे (देऊळगाव राजा), दामोधर तुळशीराम लठाड (धामणगाव बढे), अस्लम नवाब शेख (जिल्‍हा विशेष शाखा), रामधन जनार्दन गवळी (नांदुरा), आशिष रंगराव पुनकर (पोलीस मुख्यालय बुलडाणा), चंद्रशेखर मुरडकर (लोणार), शेख युसूफ इस्माईल (जळगाव जामोद).