जिल्ह्यातून दोन तरुणी गायब!; देऊळगाव राजा, जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसांत दोन तरुणी आणि दोन तरुण बेपत्ता झाले आहेत. देऊळगाव राजा शहरातील २० वर्षीय योगिता संजय पगारे ही हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी काल, ६ जुलैला देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात केली. जळगाव जामोद तालुक्यातील रायपूर येथील रेशमा नीलेश जामुनकर ही २४ वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी ५ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसांत दोन तरुणी आणि दोन तरुण बेपत्ता झाले आहेत. देऊळगाव राजा शहरातील २० वर्षीय योगिता संजय पगारे ही हरवल्याची तक्रार तिच्‍या घरच्‍यांनी काल, ६ जुलैला देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात केली. जळगाव जामोद तालुक्‍यातील रायपूर येथील रेशमा नीलेश जामुनकर ही २४ वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार तिच्‍या घरच्‍यांनी ५ जुलैला जळगाव जामाेद पोलीस ठाण्यात केली आहे.

खामगावातून युवक बेपत्ता, आई हवालदील…
खामगाव शहरातील जुना फैल भागातील ३१ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. विशाल लक्ष्मण हातमोडे असे त्‍याचे नाव आहे. तो आईसोबत राहतो. ४ जुलैला सकाळी साडेनऊला तो घरासमोर उभा होता. मात्र त्याची आई सुमनबाई त्‍याला बोलवायला गेली तेव्‍हा तो दिसला नाही. एका महिलेने विशालच्या आईला तुमचा मुलगा मस्तान चौकात जाताना दिसला, असे सांगितले. मात्र शोधूनही तो मिळाला नाही. त्‍यामुळे सुमनबाई यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली आहे. तपास एएसआय श्री. राऊत करत आहेत.
लोणवाडीतून तरुण बेपत्ता
लोणवाडी (ता. मलकापूर) येथील २३ वर्षीय नीलेश शिवाजी बावस्‍कार हा तरुण घरातून निघून गेला आहे. बराच शोध घेऊनही तो मिळून न आल्याने त्‍याच्‍या घरच्‍यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस तो हरवल्याची तक्रार काल केली.