जिल्ह्यातून 3 तरुणींसह 1 तरुण गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन असला तरी जिल्ह्यातून व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आज, 17 मे रोजी दोन तरुणींनी घर सोडले असून, त्या हरवल्याची तक्रार त्या त्या पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राजूर येथील 19 वर्षीय शेख मुस्कानबी शेख जमील ही तरुणी कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. तिच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन असला तरी जिल्ह्यातून व्‍यक्‍ती बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आज, 17 मे रोजी दोन तरुणींनी घर सोडले असून, त्‍या हरवल्याची तक्रार त्‍या त्‍या पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राजूर येथील 19 वर्षीय शेख मुस्‍कानबी शेख जमील ही तरुणी कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. तिच्‍या हरवल्याची तक्रार बोराखेडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याशिवाय खामगावच्‍या चांदमारी भागातून सरिता शिवा आहुजी ही 20 वर्षीय तरुणी 16 मेच्‍या पहाटे 5:30  पूर्वी घरात कुणाला काही न सांगता निघून गेली. नातेवाईक, मैत्रिणी व इतरत्र शोध घेतला पण मिळाली नाही. त्‍यामुळे तिची आई श्रीमती राधा शिवा आहुजी यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार आज दिली आहे.

मेहकर तालुक्‍यातील देऊळगाव साकर्शा येथील 20 वर्षीय चेतन मच्‍छिंद्र राजबिंडे हा तरुणही बेपत्ता झाल्‍याची जानेफळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, मलकापूरजवळील झोडगा गावातील 26 वर्षीय सौ. रिता नागेश्वर किनगे ही विवाहिताही बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची तक्रार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.