जिल्ह्यात उरलेत अवघे 406 कोरोनाबाधित!; 53 नवे रुग्‍ण, एक बळी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 जूनला कोरोनाने तळणी (ता. मोताळा) येथील 82 वर्षीय पुरुषाचा बळी घेतला आहे. दिवसभरात नवे 53 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 112 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. बाधितांचा आकडा गेल्या दहा दिवसांतच झपाट्याने खाली आला असून, आता अवघे 406 रुग्ण उपचार घेत आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड …
 
जिल्ह्यात उरलेत अवघे 406 कोरोनाबाधित!; 53 नवे रुग्‍ण, एक बळी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 जूनला कोरोनाने तळणी (ता. मोताळा) येथील 82 वर्षीय पुरुषाचा बळी घेतला आहे. दिवसभरात नवे 53 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 112 रुग्‍णांना बरे झाल्‍याने डिस्‍चार्ज मिळाला आहे. बाधितांचा आकडा गेल्या दहा दिवसांतच झपाट्याने खाली आला असून, आता अवघे 406 रुग्‍ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3816 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3763 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपिड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 503 तर रॅपिड टेस्टमधील 3260 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : अजिसपूर 2, तराडखेड 1, कोलवड 1, पाडळी 1, रायपूर 2, मलकापूर शहर : 5 , मलकापूर तालुका : आळंद 2, मोताळा तालुका : पिंप्री गवळी 1, सिंदखेड राजा शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : भंडारी 2, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : जांभोरा 1, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : कुंबेफळ 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : कोलारा 1, शेगाव तालुका : डोंगरगाव 1, मेहकर तालुका : मोहतखेड 1, हिवरखेड 2, खळेगाव 1, घाटबोरी 1, मोसंबेवाडी 1, शेलगाव काकडे 1, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे 2, मानेगाव 2, दादगाव 1, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : निमगाव 1, लोणार तालुका : सुलतानपूर 2, सावरगाव मुंढे 3 अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रुग्ण आढळले आहेत.

112 रुग्‍णांची कोरोनावर मात
आज 112 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 522146 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84831 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1724 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85878 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 406 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 641 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.